Kopargaon News – शहर पोलिसांची दमदार कामगिरी; 24 तासात चोराला ठोकल्या बेड्या, पावणे दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Kopargaon News – शहर पोलिसांची दमदार कामगिरी; 24 तासात चोराला ठोकल्या बेड्या, पावणे दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोर्ट रोड हरिजन कॉलनी येथे काही दिवसांपूर्वी पावणे दहा लाखांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला होता. सदर गुन्ह्याचा कोपरगाव शहर पोलिसांनी 24 तासात छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (25 जुलै) हरिजन कॉलनी कोर्ट रोड येथील मालती रुपेश हाडा यांच्या घरावर चोरट्याने डल्ला मारला. घराच्या मागील बंद दाराचा काडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकून 9 लाख 65 हजारांना ऐवज चोरून नेला होता. त्याबाबत मालती हाडा यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक आरोपी शुभम केशव राखपसरे (23) याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले व त्याच्याकडून चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आला. 24 तासात गुन्ह्याची उकल झाल्याने हाडा कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;