Nagar News – रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, काँग्रेसचा इशारा

Nagar News – रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, काँग्रेसचा इशारा

सारसनगर, विनायक नगर प्रभाग क्र. 14 मधील महालक्ष्मी रो हाऊसिंग परिसरातील रस्त्याचे काम मागील मे महिन्यापासून रखडले आहे. आतापर्यंत दोन वेळा या कामाचा शुभारंभ मनपा आयुक्त, शहराचे लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आला. फोटोसेशन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. त्यातच पावसामुळे सदर रस्त्यावर चिखल झाल्यामुळे नागरिकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने सदर रस्त्याचे काम पूर्ण करा. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपाला दिला आहे.

याबाबत किरण काळे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना लेखी निवेदन पाठविले आहे. तसेच मनपा अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. काळे यांनी निवेदन म्हटले आहे की, मे महिन्यात रस्ता खोदण्यात आला. मात्र कामाला आजतागायत सुरुवात झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे एकदा नव्हे तर दोनदा शुभारंभ झाला. सदर प्रभाग हा आमदारांचा आहे. स्वतःचा प्रभाग असून देखील जर त्यांच्याच प्रभागात रस्त्यांची, नागरी सुविधांची दयनीय अवस्था असेल, तर शहरातील अन्य भागांमधील समस्यांबाबत विचार न केलेलाच बरा. नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र स्थानिक राजकीय नेतृत्वाची दहशत असल्यामुळे कोणीही मनपाकडे लिखित तक्रार अथवा कॅमेऱ्या समोर येऊन आपली व्यथा मांडण्यास धजावत नाही. नागरिकांनी भयमुक्त होत आपल्या समस्या मांडाव्यात, काँग्रेस त्यांना संरक्षण देईल, असे आवाहन काळे यांनी यानिमित्ताने नगरकरांना केले आहे.

पाऊस सुरू असल्यामुळे काम ठप्प असल्याचे कारण सांगितले जाते. मात्र हे धादांत खोटे आहे. मे महिन्यात रस्ता खोदला. त्याच वेळी काम सुरू केले असते, तर पावसाळ्या पूर्वीच काम पूर्ण झाले असते. माञ मनापाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना मोठ्या मनस्ताप, गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या परिसरामध्ये अनेक अपघात झाले आहेत. नागरिकांचे पायी चालणे, दुचाकीवरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. असं काळे यांनी म्हटले आहे.

तातडीने सदर रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा. मंजूर इस्टिमेट, स्पेसिफिकेशन्स प्रमाणे काम करण्याची दक्षता घ्या. सक्षम प्राधिकरणाकडून टेस्ट रिपोर्ट घ्या. काम पूर्ण झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये बिल अदा करू नका. अशी मागणी काळे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.

यावेळी काळे यांनी याच परिसरातील मनपाच्या उद्यानाची नागरिकांच्या मागणीवरून पाहणी केली. सदर उद्यानामध्ये नागरिकांच्या पैशातून लाखो रुपये खर्च करुन पेव्हींग ब्लॉक, व्यायामाचे साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र उद्यानाची दुरावस्था झालेली असून यामुळे मनपाने खर्च केलेला निधी पूर्णतः वाया गेला आहे. स्थानिक नागरिक या उद्यानाचा कोणत्याही प्रकारे उपयोग करू शकत नाहीत. सदर उद्यान हे तातडीने सुस्थितीत आणा. दोन्ही मागण्या पुढील पंधरा दिवसांच्या आत मान्य न केल्यास काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा काळे यांनी दिला आहे. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, विकास गुंदेचा आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;