Shweta Bachchan: ‘संसार उद्ध्वस्त केलाय…’, अभिषेक – ऐश्वर्या यांच्या नात्यावर श्वेता बच्चन असं काय म्हणाली?

Shweta Bachchan: ‘संसार उद्ध्वस्त केलाय…’, अभिषेक – ऐश्वर्या यांच्या नात्यावर श्वेता बच्चन असं काय म्हणाली?

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा वाऱ्यासारखी चाहत्यांमध्ये पसरत आहे. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात देखील ऐश्वर्या राय तिच्या कुटुंबासोबत नाही तर, फक्त लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली. तर अभिषेक वडील अमिताभ बच्चन, आई जया बच्चन, बहीण श्वेता बच्चन आणि तिच्या मुलांसोबत पोहोचला. तेव्हा बच्चन कुटुंबियांचे व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले.

आता देखील अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अभिषेक आणि श्वेता बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोच्या सहाव्या सीझनमध्ये पोहोचले होते. तेव्हा रॅपिड फायर राऊडमध्ये करणने काही प्रश्न विचारले. त्यावर श्वेता हिने दिलेल्या उत्तरांवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

करणने श्वेताला विचारलं, ऐश्वर्या की अभिषेक? यावर क्षणाचाही विलंब न करता श्वेताने भाऊ अभिषेक याचं नाव घेतलं. त्यानंतर कठोर पालक कोण ऐश्वर्या की अभिषेक? या प्रश्नावर उत्तर देत श्वेताने ‘ऐश्वर्याचं नाव घेतलं…’ पुढे अभिषेक कोणाला जास्त घाबरतो असा प्रश्न विचारला. यावर अभिषेक म्हणाला, ‘जया बच्चन यांना’, तर श्वेता म्हणाली ‘नाही… अभिषेक पत्नीला घाबरतो…’

श्वेताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकरी देखील संताप व्यक्त करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘श्वेता बच्चन टिपिकल नणंद आहे.’ अन्य एका नेटकरी म्हणाला,’याच मुलीमुळे दोघांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे…’ सध्या सर्वत्र ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न 

ऐश्वर्या – अभिषेक यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्यामध्ये वाद सुरु आहेत. अशी चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;