पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकरांचं निक्कीशी वाजलं; ‘बिग बॉस’लाही करावी लागली प्रतीक्षा
'बिग बॉस मराठी'चा नवा सिझन सुरू झाला असून यंदा घरात 16 स्पर्धक दाखल झाले आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात एकीकडे सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता न मिळणं या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सदस्यांची चांगलीच चिडचिड होताना पाहायला मिळत आहे.
एकंदरीतच पहिल्या दिवसापासूनच सदस्यांचं खरं रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात पहिल्या दिवशीच 'तू तू मै मै' झालेलं पाहायला मिळणार आहे.
घर म्हटलं की एकत्र नांदता नांदता भांड्याला भांड लागतंच. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरातही सदस्यांमध्ये 'तू तू मै मै' झालेलं पाहायला मिळेल. 'बिग बॉस मराठी'च्या सोमवारच्या भागात वर्षा उसगावंकर या मेकअप करताना दिसून येत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List