संजय दत्त – रेखा यांचे प्रेमसंबंध, संजूबाबाची आई म्हणाली, ‘रेखा पुरुषांना सिग्नल देत आणि…’

संजय दत्त – रेखा यांचे प्रेमसंबंध, संजूबाबाची आई म्हणाली, ‘रेखा पुरुषांना सिग्नल देत आणि…’

बॉलिवूडचा असा एक अभिनेता ज्याचं आयुष्य कायम वादाच्या भोवऱ्यात राहिलं. खासगीच नाही तर, अभिनेता प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला… कायम वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या अभिनेता संजय दत्त याचा आज वाढदिवस आहे. सुनील दत्त आणि नरगिस यांच्या घरात जन्मलेल्या संजूबाबाने त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. कोणतीही भूमिका साकारताने संजूबाबा त्यामध्ये 100 टक्के प्रयत्न करतो. असं असताना देखील फिल्मी करियरमध्ये अभिनेत्याला चढ-उतारांचा सामना करावा लागला. पण संजूबाबा फक्त सिनेमांमुळे नाही तर, प्रेमप्रकरणांमुळे देखील चर्चे होता. अभिनेत्री रेखा यांच्यासोबत अभिनेत्याच्या नावाची चर्चा होती. रेखा – संजय दत्त यांच्या नात्यावर नरगिस यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

सांगायचं झालं तर, एक वेळ अशी होती, जेव्हा संजूबाबाच्या आयुष्यात काहीच ठिक नव्हतं. तेव्हा अभिनेता ‘जमीन आसमान’ सिनेमात रेखा यांच्यासोबत काम करत होता. ‘जमिन आसमान’ सिनेमा 1984 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा संजूबाबाचं करियर धोक्यात होतं, तर रेखा यशाच्या शिखरावर होत्या. अशात रेखा यांना संजूबाबाच्या ड्रग्स प्रकरणाबद्दल देखील माहिती होतं. संजूबाबाच्या पडत्या काळात रेखा यांनी अभिनेत्याला आधार दिला. रिपोर्टनुसार, तेव्हा रेखा – संजय यांच्यात भावनीक नातं देखील तयार झालं होतं.

नरगिस यांचं रेखा यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य

रेखा आणि संजूबाबा यांनी कायम दोघांमध्ये सुरु असलेल्या रोमान्सच्या चर्चांवर मौन बाळगलं होतं. पण संजूबाबाच्या आई यावर बोलण्यापासून स्वतःला थांबवू शकल्या नाहीत. रेखा यांच्याबद्दल नरगिस यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रेखा चेटकीण आहे आणि ती पुरुषांना सिग्नल देते… एवढंच नाही तर, रेखाला एका सक्षम पुरुषाची गरज आहे… असं देखील नरगिस म्हणाल्या होत्या.

रेखा सिग्नल देते – नरगिस

नरगिस म्हणाल्या होत्या, ‘रेखा कायम पुरुषांना सिग्नल द्यायची की सहज उपलब्ध आहे. काही लोकांच्या नजरेत ती चेटकीणीपेक्षा कमी नाही. मी माझ्या वेळी देखील अनेक मुलांसोबत काम केलं आहे. मला वाटतं की ती मानसिक समस्यांनी ग्रासली आहे. रेखाला एका सक्षम पुरुषाची गरज आहे…’ असं देखील नरगिस म्हणाल्या होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;