काय बिनसलंय? योगींनी फक्त राजनाथसिंह यांना हात जोडून नमस्कार केला! जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट

काय बिनसलंय? योगींनी फक्त राजनाथसिंह यांना हात जोडून नमस्कार केला! जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट

लोकसभा निवडणुकींच्या (Lok Sabha Election 2024) निकालांमध्ये भाजपची मोठी घसरण झाली आहे. भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर, स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. यामागे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील असंतोष हे कारण स्पष्ट दिसत आहे. त्यासोबतच उत्तर प्रदेशातही भाजपच्या जागांमध्ये झालेली घसरण आहे. पण भाजपची उत्तर प्रदेशातील घसरण यावरून भाजपमधे अंतर्गत काही गडबड असल्याचं समोर आलं आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्यावेळी झालेल्या फोटोसेशनचा आहे. ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेजवर येतानाचे फूटेज आहे. तेव्हा योगी आदित्यनाथ फक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना हात जोडून नमस्कार केला. मात्र मोदी-शहा यांना नमस्कार केला नाही. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला. त्यांनी कॅप्शन लिहिली आहे की,’काय बिनसलंय कुणास ठाऊक, योगीजींनी फक्त राजनाथसिंह यांना हात जोडून नमस्कार केला!’

या व्हिडीओवरून उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;