सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपचं कारण समोर, सोहैल खानकडून मोठा खुलासा

सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपचं कारण समोर, सोहैल खानकडून मोठा खुलासा

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांनी 90 च्या दशकात एकमेकांना डेट केलं. चाहत्यांनी देखील सलमान – ऐश्वर्या या जोडीला प्रचंड प्रेम दिलं. सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याची सुरुवात दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके’ सिनेमातून झाली. जवळपास 6 वर्ष ऐश्वर्या – सलमान यांनी एकमेकांना डेट केलं. दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. पण सलमान – ऐश्वर्या यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 2001 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. सलमान – ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आणि दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या…

ऐश्वर्या राय हिने सांगितलं होतं ब्रेकअपचं कारण

जेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागल्या तेव्हा खुद्द अभिनेत्रीने घडलेला प्रकार चाहत्यांना सांगितला होता. एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या राय हिने सलमान खान याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेत्रीने सलमानवर अनेक गंभीर आरोप लावले होते.

ऐश्वर्या राय म्हणाली होती, ‘सलमान खान याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे अनेक अडचणींचा सामना केला आहे. शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक अत्याचार, फसवणूक आणि अपमानाचा सामना करावा लागला.’ याच कारणामुळे ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यासोबत असलेले सर्व संबंध संपवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, ऐश्वर्या राय हिने सलमान खान याच्याबद्दल वाईट वक्तव्य केल्यामुळे सोहैल खान याने अभिनेत्रीवर निशाणा साधला होता. सलमान सोबत असलेलं नातं ऐश्वर्याने कधीच मान्य केलं नव्हतं… असं म्हणत सोहैल म्हणाला, ‘ऐश्वर्या कायम घरी यायची आणि कुटुंबियांसोबत आनंदाने राहायची. पण तिने कधीच सलमान सोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला नाही.’

‘आता ऐश्वर्या सर्वांसमोर रडत असते. जेव्हा सलमानसोबत फिरत होती, सलमानसोबत कायम घरी यायची, एखाद्या सदस्याप्रमाणे कुटुंबियांसोबत राहात होती. पण कधीच सलमान सोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळे सलमानला असुरक्षित वाटत होतं. त्याला जाणून घ्यायचं होतं, ऐश्वर्याच्या मनात नक्की काय होतं.’ असं सोहैल खान म्हणाला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;