सुझानमुळे हृतिकचं 12 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? चर्चांदरम्यान समोर आला व्हिडीओ
अभिनेता हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसोबतचं नातं कधीच लपवलं नाही. मीडिया किंवा पापाराझींना न जुमानता हे दोघं अनेकदा एकत्र दिसले. इतकंच काय तर हृतिकची पूर्व पत्नी सुझानसोबतही सबाचं मैत्रीपूर्ण नातं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हृतिक आणि सबाच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हृतिक आणि सबा यांना एकत्र पाहिलं गेलं नव्हतं. काही कार्यक्रमांमध्ये हृतिक एकटाच पोहोचला होता. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यालाही त्याने एकट्याने हजेरी लावली होती. या महिन्याच्या सुरुवातीला हृतिकला त्याची पूर्व पत्नी सुझानसोबत फॅमिली डिनरला गेल्याचं पहायला मिळालं होतं.
नुकतंच कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानच्या आईचं निधन झालं होतं. त्यांच्या अंत्यदर्शनाला हृतिक त्याच्या आईसोबत पोहोचला होता. इथेसुद्धा सबा दिसली नव्हती. म्हणून या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसल्याच्या चर्चा होत्या. या सर्व चर्चांदरम्यान आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List