मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून चार्जशीट दाखल

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून चार्जशीट दाखल

लिकर पॉलिसी प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने या प्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कथित मद्य धोरण घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आधी ईडीने नंतर सीबीआयने त्यांना अटक केली होती. कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले होते. आता सीबीआयने त्यांच्यावर चार्जशीट दाखल केली आहे.

कथित मद्यधोरण प्रकरणी ईडीने पहिला गुन्हा दाखल केला होता. ईडीने मनी लॉण्डरिंग प्रकरणी हा गुन्हा दाखल करून त्यांना 21 मार्चला अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि 16 जूनला त्यांना अटक केली होती. केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली होती. यावर आज सुनावणी होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;