ऐश्वर्या – अभिषेकच्या घटस्फोटाबाबत मोठी अपडेट?, आता …

ऐश्वर्या – अभिषेकच्या घटस्फोटाबाबत मोठी अपडेट?, आता …

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हे जोडपं सध्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. बच्चन कुटुंबाबद्दल रोज काही ना काही नवी बातमी समोर येत असते. त्यामुळे चाहत्यांची चिंताही वाढली आहे. मात्र याच सर्व परिस्थिती दरम्यान चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चनने नुकतेच पत्नी ऐश्वर्या रायला मनवण्यासाठी एक सरप्राईज दिले होते. अभिषेकने नुकतीच नवीन कार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे या कारचा 5050 हा क्रमांक ऐश्वर्याचा आवडता क्रमांक आहे. त्यामुळे अभिषेकने ऐश्वर्या रायची समजूत घातली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघे विभक्त झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसंपासून सोशल मीडियावर सुरू आहे. अंबानींच्या पार्टीला संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र आलं पण त्यावेळी ऐश्वर्या सोबत नव्हती. उलट ती
आराध्यासोबत वेगळी आल्यानंतर त्यांच्यात काहीच आलबेल नाही का, विभक्त होणार का अशा चर्चांनी जोर धरला. तेव्हापासून हे जोडपे वेगळे होत असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर अभिषेक बच्चनने नुकतीच घटस्फोटासंदर्भातील एका आर्टिकलची पोस्टही लाईक केली होती. त्यानंतर घटस्फोटाच्या बातम्यांना अधिकच वेग आला.

१७ वर्षांपूर्वी झालं होतं लग्न

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दोघांच्या चाहत्यांची संख्या कमी नाही आणि त्यांच्या वेगळं होण्याच्या बातमीने सगळेच चिंतेत पडले आहेत. अनेक वर्षांपूर्वी गुरू चित्रपटाच्या प्रीमियरवेळी न्यूयॉर्कमध्ये अभिषेकने ऐश्वर्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर 20 एप्रिल 2007 रोजी दोघे विवाहबद्ध झाले, तेव्हा त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. 2011 मध्ये त्यांची मुलगी आराध्या बच्चनचा जन्म झाला आणि आता ती 14 वर्षांची आहे.

अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो किंग या चित्रपटात दिसणार आहे. किंग या चित्रपटात शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना झळकणार असून अभिषेक बच्चन नकारात्मक भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय घोष करत आहेत तर सिद्धार्थ आनंद आणि गौरी खान या चित्रपटाचे निर्माते आहेत. आता या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाची भूमिका कशी साकारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;