Worli Hit & Run News : वरळीत आणखी एक हिट अँड रन, सात दिवसानंतर तरुणाचा दुर्दैवी अंत

Worli Hit & Run News : वरळीत आणखी एक हिट अँड रन, सात दिवसानंतर तरुणाचा दुर्दैवी अंत

राज्यात हिट अँड रनचे सत्र संपतच नाहिये. काही महिन्यांपूर्वी वरळीत हिट अँड रन मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. आत पुन्हा वरळीत आणखी एक हिट अँड रनची घटना घडली असून त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

20 जुलैला 28 वर्षीय तरुण विनोद लाड हा स्कूटरने वरळीच्या अब्दुल गफार खान मार्गावरून जात होता. तेव्हा अलिशान बीएमडबल्यु कारने लाडला मागून जोरात धडक दिली. या अपघातात विनोद गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विनोदच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे विनोद कोमात गेला होता. गेले सात दिवस नायर रुग्णालयात विनोदवर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान विनोदचा मृत्यू झाला.

या अपघाताप्रकरणी पोलिसांनी आरोपी किरण इंदुलकरविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. वरळीत हिट अँड रनची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 9 जुलैला महिर शाह या तरुणाने बीएमडबल्यु कारने एका दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिर शहाला अटकही केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;