विक्रोळीत घरगुती सिलिंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू, एक गंभीर

विक्रोळीत घरगुती सिलिंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू, एक गंभीर

विक्रोळी पूर्व पार्क साईट येथील श्रीराम सोसायटीतील एका घरात शनिवारी रात्री सिलिंडर स्पह्ट झाला. यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरी व्यक्ती 99 टक्के भाजली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आगीत घरातील सामान जळून खाक झाले.

विक्रोळी पूर्व पार्क साईट, संजय गांधीनगर येथील श्रीराम सोसायटी ही बैठी चाळ आहे. या चाळीतील एका घरात शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमाराला सिलिंडर स्पह्ट झाला. त्यामुळे श्रीराम सोसायटीत एकच घबराट पसरली. रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. रात्री 10 च्या सुमाराला आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, स्पह्ट झालेल्या घरातील राधेश्याम पांडे आणि धनंजय मिश्रा हे गंभीर भाजले. दोघांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, राधेश्याम पांडे (46) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मिश्रा 99 टक्के भाजले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;