ठाणे शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचा टोळक्याच्या हल्ल्यात मृत्यू; विरार येथील घटना
ठाण्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहर प्रमुख मिलिंद मोरे (47) यांचा एका टोळक्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी विरार येथील सेव्हेन सी बीच रिसॉर्ट येथे घडली. मिलिंद मोरे हे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र होत.
मिलिंद मोरे हे त्यांच्या कुटुंबासमवेत विरार येथील सेव्हेन सी बीच रिसॉर्ट येथे गेले होते. तेथे त्यांचा पुतण्याला एका रिक्षाने धक्का दिला. त्यावरून बाचाबाची झाली. त्यानंतर रिक्षावाल्याने गावात जात ही बाब सांगताच जमाव घटनास्थळी आला आणि त्यांनी मिलिंद मोरे, त्यांचे बंधू आणि अन्य दोघांवर हल्ला करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत वर्मी घाव बसल्याने मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. त्यानंतर जमाव पळून गेला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोरे यांच्या पार्थिवावर सोमवारी ठाण्यातील जवाहर बाग वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List