Bigg Boss Marathi : अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर.. हे आहेत बिग बॉस मराठीचे यंदाचे कंटेस्टंट
बिग बॉस मराठीचे पाचवे सिझन आजपासून सुरू झाले असून अखेर प्रेक्षकांची उत्सुकता संपली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत अखेर आज बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सिझनचे कंटेस्टंट समोर आले आहेत.
यंदाच्या सिझनमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावंकर, गायक अभिजीत सावंत, अभिनेता निखिल दामले, अभिनेता पॅडी कांबळे, अभिनेत्री योगिता चव्हाण, रिलस्टार कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, मॉडेल निक्की तांबोळी, परदेशी गर्ल इरिना रुदाकोवा, छोटा पुढारी घनश्याम दरवडे, वैभव चव्हाण, स्प्लिट्सविला कंटेस्टंट अरबाज पटेल आतापर्यंत घरात गेले आहेत. यंदाच्या पर्वात महेश मांजरेकर यांच्याऐवजी लय भारी अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List