सुबोध भावेच्या AI मालिकेला प्रेक्षकांची पसंती; प्रेक्षक म्हणतात, माही आणि अभिमन्यू यांचा…

सुबोध भावेच्या AI मालिकेला प्रेक्षकांची पसंती; प्रेक्षक म्हणतात, माही आणि अभिमन्यू यांचा…

वैविध्यपूर्ण आशय-विषय यामुळे काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस अल्पावधीतच उतरतात. सध्या अशाच एका मालिकेची जोरदार चर्चा आहे, ही मालिका म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’. सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. या मालिकांवर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम केलं आहे. मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या माध्यमातून पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आणि अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांची फ्रेश जोडी आणि प्रेमाचा विषय आगळ्यावेगळ्या पद्धतीनं मांडल्यामुळे ही मालिका प्रेक्षक पसंतीस उतरली आहे.

प्रेक्षकांची पसंती

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेला प्रेक्षक पसंती मिळतेय. ‘उत्तम कथा’, ‘माही आणि अभिमन्यू यांचा संवाद लाजवाब’,‘आम्हांला खूप आवडते ही मालिका’, ‘उत्तम अभिनयाने नटलेली ही मालिका पाहण्याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतेय’. ‘एआयचा उत्तम वापर असलेली सर्वोत्कृष्ट मालिका’ अशा अनेक चांगल्या प्रतिकिया प्रेक्षकांकडून येतायेत.

‘तू भेटशी नव्याने’ मालिका चर्चेत

अगदी सुरुवातीपासूनच या मालिकेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालाय, याबद्दल सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर यांनी सांगितलं, ‘मालिकेला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून चांगलं काम करायला अजून उत्साह मिळतो. पडद्यावरचे आणि पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचीच खूप छान भट्टी जमून आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत असून मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रिया मराठे आणि किशोरी आंबिये यांच्यामुळे मालिकेत सध्या रंजक वळण आलं आहे. आयुष्यात पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात. याच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांतल्या वेगळ्या शैलीत दिसत आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;