विधानसभा निवडणुकीपूर्वीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार; शरद पवार यांचे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन

विधानसभा निवडणुकीपूर्वीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार; शरद पवार यांचे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नगर येथे भेट घेतली. सुमारे 20 मिनिटे त्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर शरद पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आरक्षणाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीआधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शरद पवारांनी शिष्टमंडळाला दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, असेही शरद पवारांनी म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते.

मराठा कार्यकर्ते गजेंद्र दांगट म्हणाले की, आज सकल मराठा समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यात शरद पवार यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एकनाथ शिंदे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार असतील तर राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यात कुठलेही राजकारण न करता मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदेंना समर्थन देईल. आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आम्ही सर्व राजकीय नेते एकत्र येऊन विधानसभेच्या आधी हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन शरद पवारांनी दिले.

मराठा समाजाने शरद पवारांना सांगितले की, इतके दिवस मराठा समाजाने राज्यासाठी केले. मात्र, आता सर्व नेत्यांनी एकत्र येत मराठा समाजासाठी करावे. त्यावर शरद पवारांनी सकारात्मक उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीआधी तुम्ही गुलाल उडवाल, असा आम्हाला शब्द देण्यात आलेला आहे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळेल, असे संकेत शरद पवारांनी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

मराठा कार्यकर्ते मदन आढाव म्हणाले की, आम्ही सगळे शरद पवार यांना भेटायला आलो होतो. आम्ही त्यांना सांगितलं की, आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. शरद पवार यांनी आम्हाला सांगितले की, जो निर्णय मुख्यमंत्री घेतील आपण त्याच्यासोबत राहू. मात्र, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की, इतके दिवस मराठा समाजात तुमच्यासोबत राहिला आहे. आता तुम्हाला द्यायची वेळ आली आहे तर ते तुम्ही दिले पाहिजे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांना बोलावून मी माझं म्हणणं स्पष्ट करेल, असे पवार यांनी म्हटल्याची माहिती त्यांनी दिली आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;