नगर महापालिकेकडून सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू; सावेडी उपनगर परिसरातील पाच आस्थापनांना दंड

नगर महापालिकेकडून सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू; सावेडी उपनगर परिसरातील पाच आस्थापनांना दंड

सिंगल युज प्लास्टिकविरोधात नगर महापालिकेकडून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे हॉटेल्स व दुकाने अशा पाच आस्थापनांना महापालिकेकडून 25 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. शहरात सध्या केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत हरितकचरा उचलणे, प्लास्टिक बंदीची शंभर टक्के अंमलबजावणी करून प्लास्टिकचा कचरा कमी करणे, यासह आरोग्य विषयक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अंतर्गत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रोफेसर कॉलनी चौकातील दुकाने, हॉटेल्सची तपासणी केली. यात प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या रुचिरा स्वीट्स, हॉट चिप्स, अक्किज बर्गर कॅफे, बॉम्बे ग्रिल कॅफे, जाधव वडेवाले या पाच आस्थापनांना प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे 25 हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच 15 किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत स्वच्छता निरीक्षक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

दर रविवारी सकाळी 1 तास घर व कॉलनी मध्ये स्वच्छता मोहीम राबवून पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या सर्व अभियानात व मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्याचा घेण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी, आपल्या कुटुंबाला साथीच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;