यशश्री शिंदे हत्याप्रकरणी उरणमधील महिला संतप्त; भाजप आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयावर बांगड्या फेकल्या

यशश्री शिंदे हत्याप्रकरणी उरणमधील महिला संतप्त; भाजप आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयावर बांगड्या फेकल्या

यशश्री शिंदे हत्याप्रकरणी उरणमधील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. संतप्त महिलांनी मोर्चा काढला. हा मोर्चा भाजप आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयमोर आल्यावर जोरदार घोषणा देण्यात आल्या. मात्र, बालदी यांनी मोर्चाकजे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त महिलांनी बालदी यांच्या कार्यलयावर बांगड्या फेकत निषेध व्यक्त केला. तसेच महेश बालदी बाहेर या, अशा जोरदार घोषणा दिल्या.

उरण मधील यशश्री शिंदे या तरुणीची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून त्याने ते झुडपात फेकले. या घटनेनंतर उरणमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उरणकरांचा मोर्चा निघाला. या प्रकरणातील नराधमाला अटक करून त्याला तात्काळ फासावर लटकवा अशी मागणी मोर्चेकर्‍यांनी केली. हा मोर्चा भाजप आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयासमोर आला. मात्र बालदी यांनी या मोर्चाकडे सपशेल दुर्लक्ष केले.

बालदी यांनी दुर्लक्ष केल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. संतप्त महिलांनी ‘बाहेर या, बाहेर या, महेश बालदी बाहेर या’ अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतरही बालदी मोर्चाला सामोरे गेले नाहीत. त्यामुळे संतप्त मोर्चेकरी महिलांनी त्यांच्या कार्यालयावर बांगड्या फेकल्या. बालदी यांच्या कार्यलयावर बांगड्या फेकत महिलांनी निषेध व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;