साबरमती प्रकल्पाच्या धर्तीवर पुण्यात सुरू असलेल्या कामांमुळे पुणे उद्ध्वस्त होतंय, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

साबरमती प्रकल्पाच्या धर्तीवर पुण्यात सुरू असलेल्या कामांमुळे पुणे उद्ध्वस्त होतंय, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

पुण्याला गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गुजरातमधील साबरमती नदीकाठी केलेल्या प्रकल्पाच्या धर्तीवर भाजपने पुण्यात तसाच प्रयत्न केला. मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली नदीमध्ये भराव टाकून सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीचे पात्र अरूंद केले आहे. त्यामुळे पुण्यात हा पूर आल्याची टीका होत आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

” पुण्यातील नियोजन शून्यतेमुळे पूर येऊन शहर उद्ध्वस्त झाले आहे. सत्ताधारी आणि बिल्डर लॉबी यांची अभद्र युती या पूराला जबाबदार आहे. साबरमती नदीकाठचा प्रकल्प गुजरातमधील आर्किटेक्टच्या माध्यमातून पुण्यात कॉपी पेस्ट करण्यात आले आणि पुणे उद्ध्वस्त केले. पुण्यातील नदीचा प्रवाह लक्षात न घेता हा प्रकल्प आखण्यात आल्याने हा पूर आला आहे. पुण्यातील नदीकाठचा प्रकल्प हा आंधळेपणाने तयार केलेला प्रोजक्ट आहे. मी पर्यावरण मंत्री असताना मी हा प्रोजेक्ट थांबवून पुन्हा संपूर्ण प्रोजक्टची आखणी करण्यास सांगितली होती. मात्र आमचे सरकार पाडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून पुणे महानगरपालिका आणि मिंधे सरकार या प्रोजेक्टला पाठिंबा देत आहेत. पुण्यातील अनेक शहर विकासकांनी व आर्किटेक्टने याविरोधात आवाज उठवला आहे. मी देखील आवाज उठवलाय. हा प्रोजेक्ट पुण्यासाठी अडचणीच निर्माण करणार आणि यंदाच्या पूराच्या माध्यमातून आपण त्याचे परिणाम पाहिलेच आहेत. नदीकाठचे बांधकाम हे तत्काळ थांबविले पाहिजे. नद्या स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. डेब्रिज नद्यांमध्ये टाकून त्या नदीचे काँक्रीटीकरण किंवा काँक्रीटचं डबकं बनवायचं नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

सोबतच येत्या आठवड्यात ते पुण्याला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ”मी या आठवड्यात पुण्याला जाणार आहे. त्यावेळी मी पूरग्रस्त भागांना भेट देणारच आहे पण सोबत या रिव्हरफ्रंट प्रोजेक्टमुळे व बेकायदेशीर बांधकामांमुळे पुण्याचे किती नुकसान होणार आहे हा मुद्दा मी पुन्हा अधोरेखित देखील करणार आहे” असेही या ट्विटमधून सांगण्यात आलेय.

पुणे बुडाले

गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर भाजपने मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली नदीमध्ये भराव टाकून सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीचे पात्र अरूंद केले. परिणामी दोन दिवसाच्या पावसांत बंडगार्डन येथे अरूंद प्रवाहाच्या फुगवट्याने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुणेकरांचे जनजीवन उद्ध्वस्त होण्यास केवळ भाजप जबाबदार असल्याची टिका पर्यावरणतज्ज्ञांसह विविध राजकीय पक्षांकडून केली जात आहे.

भाजपने नदी सुधार प्रकल्पआणला असून नदीपात्रात बंडगार्डन ते मुंढवा दोन्ही बाजूने 150 फुट आत काम करत आहेत. त्याशिवाय 100 फुट रूंदीचा रस्ता नदीपात्रात भर घालून करत आहेत. हा पुर्णपणे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा आहे. साबरमती प्रकल्पाचे सल्लागारच देशभरात विविध रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचे काम करत आहे. याची किंमत पुणेकरांना मोजावी लागणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;