प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत दिल्लीत घडलेली धक्कादायक घटना, रात्री कारमधून 6 पुरुष निघाले, ड्रायव्हरने हात पकडला आणि…

प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत दिल्लीत घडलेली धक्कादायक घटना, रात्री कारमधून 6 पुरुष निघाले, ड्रायव्हरने हात पकडला आणि…

प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री तिलोत्तमा शोम ओटीटी प्लॅटफॉर्मवरील गाजलेलं नाव आहे. ‘त्रिभुवन मिश्रा CA टॉपर’ आणि ‘कोटा फॅक्ट्री 3’ या वेब सीरिजमध्ये दमदार अभिनय केल्यानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियेत मोठी वाढ झाली. आता अभिनेत्रीसोबत घडलेली धक्कादायक घटना अनेक वर्षांनंतर समोर आली आहे. काही लोकांनी एकट्या अभिनेत्रीला पाहिल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने दिल्लीत रात्रीच्या वेळी तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. दिल्ली तिलोत्तमा शोम हिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे.

तिलोत्तमा शोम म्हणाली, ‘थंडीचे दिवल होते. संध्याकाळ होती आणि अंधार व्हायला सुरुवात झाली होती. मी बस स्टॉपवर उभी राहून बसच्या प्रतीक्षेत होती. तेवढ्यात एक कार समोरून आली माझ्या समोर थांबली. कारमधून 6 पुरुष बाहेर आले आणि माझ्या भोवती उभे राहिले. त्यांना पाहिल्यानंतर मी प्रचंड घाबरली होती. त्या पुरुषांनी माझ्यावर दगड देखील फेकून मारले… मदत मागण्यासाठी मी गाडीची प्रतीक्षा करत होती. तेवढ्यात एक कार समोरून आली आणि कारवर मेडिकलचं चिन्ह होतं.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tillotama Shome (@tillotamashome)

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मेडिकल चिन्ह आहे म्हणून मला वाटलं की डॉक्टरांची गाडी असेल. त्यांनी गाडी थांबवली मी गाडीत बसली. पण त्या गाडीत देखील मी सुरक्षीत नव्हती. गाडीतील ड्रायव्हर माझ्यासोबत गैरवर्तन करु लागला होता. ड्रायव्हरने त्याच्या पॅन्टची झीप उघडली आणि बळजबरी माझा हात त्याच्या प्रायव्हेट पार्टला लावू लागला. तेव्हा माझ्या मनातील भीती आणखी वाढू लागली. रागात मी ड्रायव्हरला जोरात धक्का दिला. धक्का दिल्यानंतर ड्रायव्हरला गाडी थांबवावी लागली…’ अखेर त्या ड्रायव्हरने तिलोत्तमा शोम हिला गाडीतून बाहेर काढलं. तिलोत्तमा शोम हिच्यासाठी ‘तो’ प्रसंग फार कठीण होता.

अभिनेत्री तिलोत्तमा शोम हिने अनेक सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील तिलोत्तमा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिलोत्तमा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिलोत्तमा हिचे 172K फॉलोअर्स आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;