मानसी नाईकच्या पहिल्या नवऱ्याने उरकला साखरपुडा, ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला…

मानसी नाईकच्या पहिल्या नवऱ्याने उरकला साखरपुडा, ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला…

‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यांवर भन्नाट डान्स करत चाहत्यांना देखील ठेका धरायला लावणारी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी हिने 2021 मध्ये मोठ्या थाटात प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्न केलं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त केला. अनेक मुलाखतींमध्ये मानसी हिने प्रदीप याच्यावर निशाणा साधला. दरम्यान मानसी आणि प्रदीप यांची घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रदीप याने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. प्रदीप याने साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर प्रदीप याने होणाऱ्या पत्नीसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट केले आहे.

प्रदीप याने कुटुंबियांच्या उपस्थितीत गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर प्रदीप याच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. प्रदीप यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव विशाखा पनवार असं असून विशाखा सोशल मीडिया स्टार आहे. सोशल मीडियावर प्रदीप याचे तब्बल 6 मिलियन्स फॉलोअर्स आहेत. विशाखा हिने देखील सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by VISHAKA PANWAR🧿 (@vishaka__jaatni)

 

साखरपुड्याचा एक व्हिडीओ पोस्ट करत प्रदीप याने कॅप्शनमध्ये, ‘अखेर साखरपुडा झाला… आम्ही करुन दाखवलं…’ असं लिहिलं आहे. सोशल मीडियावर चाहते दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप आणि विशाखा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट टकरत होते. दोघांच्या डेटींगच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगल्या होत्या.

अखेर साखरपुडा कडून विशाखा – प्रदीप यांनी रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शिवाय नुकताच त्यांचा म्युझिक अल्बमही लॉन्च केला आहे. ‘सेल्फी सॉन्स’ असं विशाखा, प्रदीप यांच्या गाण्याचं नाव आहे. विशाखा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या सर्वत्र विशाखा – प्रदीप यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pardeep Kharera (@pardeepkharera1)

 

प्रदीप खरेरा – मानसी नाईक

प्रदीप खरेरा – मानसी नाईक यांच्या लग्नाचे आणि लग्नापूर्वीच्या विधींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नात दोघे देखील आनंदी होते. पण लग्नाच्या काही दिवसांत दोघांमध्ये खटके उडू लागले अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 19 जानेवारी 2021 रोजी मानसी आणि प्रदीप यांनी लग्न केलं होतं.

मानसी नाईक कोणाला करतेय डेट?

मानसी हिने पॅरिसमधील बॉयफ्रेंडसोबत खास फोटो पोस्ट करत ‘पॅरिसियन जादू… क्षणांना आठवणींमध्ये बदललं…’ असं लिहिलं होते. मानसी हिच्या बॉयफ्रेंडचं नाव राहुल खिस्मतराव असल्याचं समोर येत आहे. राहुल अंतराळ शास्त्रज्ञ आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;