Mumbai News : विक्रोळीत सिलेंडरचा स्फोट होऊन झोपडीला आग, दोन जण होरपळले!
मुंबईतील विक्रोळी परिसरात एका झोपडीत सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सिलेंडरच्या स्फोटानंतर झोपडीला आग लागल्याने दोन जण आगीत होरपळले आहेत. दोघा जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धनंजय मिश्रा आणि राधेश्याम पांडे अशी जखमींची नावे आहेत.
विक्रोळीतील संजय नगरमध्ये श्रीराम सोसायटीमध्ये शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. स्फोट होताच शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेत पाणी टाकून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अग्नीशमन दलालाही आगीची माहिती देण्यात आली. मात्र अग्नीशमन दलाचे कर्मचारी येईपर्यंत नागरिकांनी आग विझवली होती. अग्नीशमन दल पुढील तपास करत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List