Nagar News – आयशर टेम्पोची पिकअपला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

Nagar News – आयशर टेम्पोची पिकअपला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला भरधाव आयशर टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे. नगर सोलापूर महामार्गावरील कर्जत तालुक्यात मिरजगाव जवळील कोकणगाव बायपास जवळ हा अपघात घडला. या अपघातात जामखेड येथील तरुण पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. महेश उर्फ (मयुर) भगवान मोरे असे मयत चालकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील कोकणगाव जवळील बायपासजवळ शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिकअप नगरहून मिरजगावच्या दिशेने जामखेडकडे येत होता. मात्र बायपासजवळ टायर पंक्चर झाल्याने चालकाने महामार्गाच्या बाजूला पिकअप थांबवला होता. चालक महेश पंक्चर झालेला टायर बदलत असताना समोरुन येणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने पिकअपला धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की पिकअप टेम्पो पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. आयशर टेम्पोही अपघातानंतर पलटी झाला. घटनेची माहिती मिळताच मिरजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू बागवान तसेच जीवन ज्योती रुग्णवाहिकेचे लहू बावडकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

मिरजगाव पोलीस स्टेशनची संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. मिरजगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पिकअप चालकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;