अर्नाळा समुद्रात जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न; मुलीला वाचवले, मुलाचा शोध सुरू
अर्नाळा समुद्रात उडी मारून एका अल्पवयीन प्रेमी युगुलानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. स्थानिकांनी मुलीला वाचविण्यात यश मिळवले आहे. मात्र मुलगा बुडाला असून त्याचा शोध सुरू आहे.
विरार पश्चिमेला ग्लोबल सिटी परीसरात राहणारे 17 व 19 वर्षांचे एक अल्पवयीन प्रेमी युगुल 3 दिवसांपूर्वी घर सोडून पळून गेले होते. शनिवारी अर्नाळा सागरी पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. दोघांचे जबाब नोंदवून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले होते.

संध्याकाळी 6 च्या सुमारास हे दोघे अचानक नजर चुकवून पोलीस ठाण्यासमोर असलेल्या समुद्रकिनारी गेले आणि समुद्रात उडी मारली. स्थानिकांनी बुडणाऱ्या मुलीला वाचवले तर बुडालेल्या मुलाचा शोध सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List