Nagpur News : पती-पत्नीच्या वादात पडणे महागात पडले, घरमालकाने भाडेकरूला चाकूने भोसकले!

Nagpur News : पती-पत्नीच्या वादात पडणे महागात पडले, घरमालकाने भाडेकरूला चाकूने भोसकले!

पती-पत्नीतील वाद मिटवण्याचा प्रयत्न भाडेकरूच्या जीवावर बेतला आहे. भाडेकरू सतत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या रागातून घरमालकाने भाडेकरूची हत्या केली. घरमालकाने भाडेकरूवर चाकूने हल्ला केला. नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. चाकूहल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने भाडेकरूचा काही वेळातच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी घरमालकाला अटक केली आहे. महेश उके असे आरोपीचे तर पंकज सोलंकी असे मयताचे नाव आहे.

पंकज हा खाजगी कंपनीत कामाला होता. शुक्रवारी रात्री पंकज नेहमीप्रमाणे कामावरून घरी आला. त्यावेळी घरमालक महेश उके व त्याच्या पत्नीचे कडाक्याचे भांडण सुरू होते. भांडण मिटवण्यासाठी पंकज मध्ये पडला आणि दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला.

मात्र पत्नीसोबतच्या वादात पंकजचा काहीही संबंध नसताना तो मध्यस्थी करीत असल्याचा राग महेशला अनावर झाला. त्याच रागाच्या भरात महेशने पंकजच्या पोटात चाकू खुपसला. या हल्ल्यात पंकज रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला.

पंकजला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी महेश उकेला अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;