मालाडमध्ये एमबीएच्या विद्यार्थ्याची सातव्या मजल्यावरुन उडी, अभ्यासाच्या तणावातून टोकाचे पाऊल

मालाडमध्ये एमबीएच्या विद्यार्थ्याची सातव्या मजल्यावरुन उडी, अभ्यासाच्या तणावातून टोकाचे पाऊल

अभ्यासाच्या तणावातून एमबीएच्या विद्यार्थ्याने राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मालाडमध्ये घडली. ध्रुविल व्होरा असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. मालाड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या माहितीनुसार, ध्रुविल हा एमबीएच्या पहिल्या वर्षात शिकत होता. ध्रुविल विलेपार्ले येथे शिकत असून हॉस्टेलमध्ये राहत होता. शुक्रवारी तो मालाड येथे आपल्या घरी गेला. आई आणि बहिणीसोबत गप्पा मारल्या. मग कामानिमित्त बाहेर गेलेल्या वडिलांसोबत फोनवर बोलला. त्यानंतर वडिलांची स्कूटी दुरुस्तीसाठी घेऊन जाण्याच्या बहाण्याने घरातून गेला.

ध्रुविल घरातून गेला आणि थेट इमारतीवरुन खाली उडी घेतली. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ कांदिवली पश्चिमेकडील तुंगा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मालाड पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अभ्यासाच्या तणावातून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;