सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; राष्ट्रपतींनी केली 6 नवीन राज्यपालांची नियुक्ती

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; राष्ट्रपतींनी केली 6 नवीन राज्यपालांची नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शनिवारी रात्री उशिरा सहा नवीन राज्यपालांची नियुक्ती केली. पंजाब आणि चंदीगढचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा स्वीकारताना राष्ट्रपतींनी सहा नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा केली, तर तीन विद्यमान राज्यपालांकडे दुसऱ्या राज्यांचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यानुसार सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार, भाजपचे ज्येष्ठ नेते ओ. पी. माथुर व सी. एच. विजयाशंकर यांचा नवीन राज्यपालांच्या नियुक्तीमध्ये समावेश आहे. गुजरातचे माजी मुख्य सचिव के. कैलाशनाथन यांची पॉंडिचेरीचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कैलाशनाथन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली असून गंगवार हे झारखंडचे, तर माथुर सिक्कीमचे नवीन राज्यपाल बनले आहेत. त्याचबरोबर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रामेन डेका छत्तीसगडमध्ये राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत, विजयाशंकर हे मेघालयचे राज्यपाल असतील.

राज्यपालांच्या नवीन नियुक्त्या

– हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.

– जिष्णु देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

– ओम प्रकाश माथूर यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.

– संतोषकुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

– रामेन डेका यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

– सी. एच. विजयाशंकर यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

– सध्या तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार असलेले झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील.

– आसामचे विद्यमान राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची पंजाब व चंदीगढचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

– सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना आसामचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मणिपूरचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;