दखल – समृद्ध अनुभवविश्व
सुधा मूर्ती यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी लिहिलेले हे पुस्तक अनेक संदर्भांत महत्त्वाचे आहे. सुधा मूर्तींचा प्रवास श्रीमंत आणि समृद्ध आहे. असे अनुभवविश्व फार कमी लोकांच्या वाट्याला येते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एका छोटय़ा गावातल्या मुलीने आपल्या स्वयंप्रज्ञ इच्छाशक्तीच्या बळावर आकाशाला गवसणी घालावी, ही गोष्ट विलक्षण अशीच आहे. ज्यांना माणूस समजून घेण्यात रस आहे, त्यांना तर ही गोष्ट फारच आवडेल. इंग्लंडच्या माजी पंतप्रधानांच्या सासूबाई असणाऱ्या सुधा मूर्ती आता आपल्या राज्यसभेत खासदार म्हणूनही दिसणार आहेत. एक मोठा उद्योगसमूह उभा करणे, चालवणे; सामाजिक कामांसाठी पुढाकार घेणे, विविधांगी आणि वाचकप्रिय लेखन करणे अशा अनेक रूपांतून आपल्याला भेटणाऱया सुधा मूर्तींचा हा अवघा जीवनपट वाचताना आपणही थक्क होतो. डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी त्यासाठी पुष्कळ परिश्रम केले असतीलच; पण तितक्याच सहज आणि सळसळत्या शैलीत हा पट त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. सुधा मूर्ती यांच्या चाहत्यांना तर हा पट आवडेलच; पण त्यांच्याविषयी आक्षेप असणाऱयांनाही हा जीवनप्रवास समजून घेणे महत्त्वाचे वाटेल.
सुधा मूर्ती
लेखक : डॉ. ज्योती धर्माधिकारी
प्रकाशन : साकेत प्रकाशन, छ. संभाजीनगर
पृष्ठे : 192 ह किंमत : 225 रु.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List