दखल – आत्मोद्धाराचा मार्ग
आज ‘मेडिटेशन’ किंवा ‘ध्यानधारणा’ हा शब्द कॉर्पोरेट जगतामध्येही प्रचलित झालेला दिसतो. प्रत्येकाला जीवनाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत स्वतःला सिद्ध करायचं असतं. स्वामी विवेकानंदांनी 125 वर्षांपूर्वी ध्यान आणि त्याच्या पद्धती यावर केलेली भाषणं आपण वाचली तर लक्षात येईल की, आजच्या तरुणांच्या सर्व समस्यांचं इतकं परिपूर्ण, अचूक, बिनतोड, मार्मिक आणि चपखल समाधान अन्यत्र सापडणं दुर्मीळ आहे.
ध्यानाला बसायची जागा कशी असावी? इथपासून ते ध्यान करताना बाळगण्याची सावधगिरी, योगशास्त्रानुसार ध्यानाच्या पायऱ्या कोणत्या, मनाला ध्यानासाठी कसं तयार करावं हे सांगताना हळूहळू स्वामीजी आपल्याला ध्यानाच्या परमोच्च स्तराकडे घेऊन जातात. मानवी जीवनाचं परमोच्च ध्येय म्हणजे ईश्वरप्राप्ती, असा ज्यांचा निश्चय झालेला आहे, त्यांना या पुस्तकातून साधनमार्गावर दृढतेने कसं चालावं याचा वस्तुपाठ मिळेल. ज्यांना मानवी जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे, हे अजून तितकंसं उमगलेलं नसेल त्यांना हे पुस्तक आत्मोद्धाराचा मार्ग दाखवेल.
ध्यान आणि त्याच्या पद्धती
लेखक : स्वामी विवेकानंद
अनुवाद : डॉ. वैदेही लिमये
प्रकाशन : साकेत प्रकाशन, छ. संभाजीनगर
पृष्ठसंख्या : 184 ह किंमत : 250 रु.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List