लाईट बिल हा अधिकृत बांधकामाचा पुरावा नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

लाईट बिल हा अधिकृत बांधकामाचा पुरावा नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

वीज पाणीजोडणी मिळाल्याचे सांगून घर वा दुकान अधिकृत असल्याचा दावा करणाऱ्या रहिवाशांना उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. लाईट बिल हा अधिकृत बांधकामाचा पुरावा नाही. आपल्याला वीजजोडणी मिळाली आहे, असे सांगून कुणी बांधकाम अधिकृत असल्याचा दावा करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत न्यायालयाने प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळील दुकानदाराला दिलासा देण्यास नकार दिला.

पूजेच्या साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानदाराने पालिकेच्या कारवाईपासून संरक्षण मागत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. दुकानाच्या नियमितीकरणाचा अर्ज पालिकेने बेदखल ठेवला आहे. तो अर्ज विचारात घेण्यासाठी पालिकेला निर्देश द्या, अशी विनंती दुकानदाराने केली. तथापि, फुटपाथला खेटून दुकान उभारल्याचे छायाचित्रातून निदर्शनास आल्याने खंडपीठाने दुकानदाराला दिलासा देण्यास नकार दिला. तसेच पालिकेची परवानगी न घेताच दुकानाचे बांधकाम केल्याबद्दल त्याची कानउघाडणी दिली. यावेळी दुकानदाराने दुकानात वीज जोडणी असल्याचे सांगून याचिकेसोबत जोडलेल्या लाईट बिलाकडे लक्ष वेधले. लाईट बिलाच्या आधारे दुकानाचे बांधकाम अधिकृत असल्याचा त्याने केलेला दावा खंडपीठाने धुडकावला.

कायदा हातात घेऊ नका

दुकान उभे असलेली जागा खासगी आहे. त्यामुळे पालिकेला दुकान नियमितीकरणाच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी निर्देश द्या. गणेशोत्सव जवळ आला आहे. या सणासुदीतच पालिकेने कारवाई केली तर उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवेल, असा युक्तिवाद दुकानदारातर्फे करण्यात आला. त्यावर खंडपीठ संतप्त झाले. सण जवळ आला म्हणून कायद्याची चौकट ओलांडून तुम्हाला सवलत द्यायची का? भले तुमची जागा खासगी असेल, मात्र कुठलेही बांधकाम करण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेतलीच पाहिजे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, असा सज्जड दम न्यायालयाने दुकानदाराला भरला आणि याचिका निकाली काढली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;