धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करू देणार नाही! स्थानिकांचे आज आंदोलन
धारावीचा पुनर्विकास व्हावा, पण धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये नको, अशी भूमिका मुलुंडकरांनी घेतली आहे. मुलुंडमध्ये पुनर्वसनाला विरोध करण्यासाठी रविवारी सकाळी 10 वाजता मराठा मंडळ गेट, मुलुंड पूर्व येथे आंदोलन करण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे.
अदानीच्या कंपनीमार्फत धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार असून अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात येणार आहे. लाखो धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये झाल्यास नागरी सेवांवर याचा ताण पडणार आहे. याआधीच मुलुंडमध्ये वाहतूककोडींची समस्या असून आरोग्याशी निगडित सुविधांवरही याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच करावे, अशी मागणी केली जात आहे, मात्र मुलुंडकरांना ग्राह्य न धरता या ठिकाणी धारावीकरांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. सागर देवरे यांच्या प्रयास संस्थेतर्फे रविवारी आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, या आंदोलनात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी अॅड. सागर देवरे यांना नवघर पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List