24 वर्षांनंतर झाले विभक्त, खान कुटुंबाशी तोडलं नातं; सलमानच्या भावाला का दिला घटस्फोट?
अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहैल खान याने 1998 मध्ये फॅशन डिझायनर सीमा सजदेहशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 24 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. सीमाने एका पॉडकास्ट मुलाखतीत सोहैलसोबतच्या घटस्फोटामागचं कारण सांगितलं होतं.
सीमाने सांगितलं होतं की तीन महिन्यांच्या डेटिंगनंतर ती सोहैलसोबत घरातून पळाली होती. नंतर वयाच्या 22 व्या वर्षी तिने सोहैलशी लग्न केलं होतं. त्या वयात असताना पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यावर खूप असुरक्षितता वाटायची आणि माझ्यावर सोशल दबावही होता, असंही तिने सांगितलं होतं.
सोहैलला घटस्फोट देण्याचा निर्णय कधी घेतला, असा प्रश्न विचारल्यावर सीमा म्हणाली, "ही गोष्ट कोणापासून लपलेली नव्हती की सोहैल आणि मी काही वर्षांपूर्वीच विभक्त झालो होतो. आम्ही सोबत राहतच नव्हतो. मात्र जगाला असं वाटायचं की आम्ही सोबत आहोत."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List