Raigad News : मैत्रिणीकडे जाते सांगून गेली ती परतलीच नाही, मग थेट मृतदेहच सापडला!

Raigad News : मैत्रिणीकडे जाते सांगून गेली ती परतलीच नाही, मग थेट मृतदेहच सापडला!

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मैत्रिणीकडे गेलेल्या तरुणीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात हत्येची नोंद करण्यात आली आहे. तरुणीची हत्या कुणी व कोणत्या कारणातून केली? याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

मैत्रिणीकडे गेली ती परतलीच नाही

उरणमध्ये राहणारी 22 वर्षीय यशश्री शिंदे बुधवारी आपल्या आईला मैत्रिणीकडे जाते सांगून घरुन गेली. त्यानंतर यशश्री घरी आलीच नाही. आईने सर्वत्र शोध घेतला. मात्र ती सापडलीच नाही. अखेर गुरुवारी तिच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदवली.

यशश्रीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तिचा शोध सुरु केला. शनिवारी सकाळी उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळील निर्जन रस्त्यावर यशश्रीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;