फक्त 5 मिनिटं बोलू दिलं, मग माइक बंद केला, अपमान झाल्याने ममतांचा संताप; नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या

फक्त 5 मिनिटं बोलू दिलं, मग माइक बंद केला, अपमान झाल्याने ममतांचा संताप; नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या नीती आयोगाच्या बैठकीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार घातला आहे. या बैठकीला पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थिती लावली. पण आपला अपमान झाल्याचे सांगत ममता बॅनर्जी या बैठकीतून बाहेर पडल्या आहेत.

मला फक्त पाच मिनिटं बोलू दिलं. दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना 20 मिनिटं बोलण्याची संधी दिली. माझ्या आधी पाचजण बोलले. त्यांना कोणी रोखलं नाही. कोण 20 मिनिटं, कोण 15 मिनिटं तर कोण 10 मिनिटं बोललं. विरोधी पक्षांकडून बैठकीत मी एकटी उपस्थित होते. मला फक्त पाच मिनिटंच बोलू दिलं. मला आणखी बोलायचं होतं. पण पाच मिनिटांनंतर माइक बंद करण्यात आला. बैठकीत आपल्याला बोलू दिलं नाही. हा आपमान आहे. आणि यापुढे नीती आयोगाच्या कुठल्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला आहे.

तुम्ही इतर राज्यांशी भेदभाव करू नका. याचा फेरविचार तुम्ही केला पाहिले. मी फक्त पश्चिम बंगालबाबत बोलत नाही. तर प्रत्येक राज्याला समान न्याय द्या. तुम्ही निर्देश देतात, अंमलबजावणीचं काम आम्ही करतो. नियोजन आयोग असताना पूत्येक राज्यासाठी नियोजन केले जात होते. पण नीती आयोगाला तर कुठलेही आर्थिक अधिकार नाहीत. मग नीती आयोग काम कसं करणार? आयोगाला आर्थिक अधिकार दिले पाहिजे. नाहीतर नियोजन आयोग पुन्हा आणा. पूर्ण काम केले तुम्ही केंद्र सरकार चालवता. सर्व राज्यांचा विचार केला पाहिजे. तुमच्या पक्षांचे सरकार आणि विरोधी पक्षांचे सरकार असेलल्या राज्यांमध्ये मतभेद करणार तर देश कसा चालवणार? तुम्ही सरकार चालवता तेव्हा सर्वांचा विचार केला पाहिजे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;