Kupwara Encounter – सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक जवान शहीद तर चार जखमी

Kupwara Encounter – सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक जवान शहीद तर चार जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला. तर मेजर रँकच्या अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले आहेत. तसेच या चकमकीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात आला आहे. कुपवाडामधील माछिल सेक्टरमधील जंगलात लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

चकमकीनंतर लष्कराकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. कुपवाडा माछिल सेक्टरच्या कामकारीमधील फॉर्वर्ड पोस्टवर दहशतवाद्यांशी हा गोळीबार झाला. या गोळीबारात एका दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात आला असून, हिंदुस्थानचे चार जवान जखमी झाले तर एका जवानाला वीरमरण आले.

नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी बॉर्डर ॲक्शन टीमने (BAT) केलेला हल्ला हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी यशस्वीपणे हाणून पाडला आहे. कुपवाडामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सेनेकडून या भागात दहशतवादी विरोधी मोहिम सुरु होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;