अलिबागच्या समुद्रातून 14 खलाशी एअरलिफ्ट; तटरक्षक दल, रायगड पोलीस यांनी संयुक्तपणे बचाव मोहीम राबवली

अलिबागच्या समुद्रातून 14 खलाशी एअरलिफ्ट; तटरक्षक दल, रायगड पोलीस यांनी संयुक्तपणे बचाव मोहीम राबवली

अलिबाग समुद्रात जेएसडब्ल्यू कंपनीचे मालवाहू जहाज काही तांत्रिक कारणाने बंद पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती. या जहाजावरील 14 खलाशांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे. तटरक्षक दल व रायगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही बचाव मोहीम राबवली. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जहाजातील सर्व 14 खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले आहे.

गुरुवारी धरमतर येथून कोळसा घेऊन जेएसडब्ल्यू कंपनीचे जहाज जयगडच्या दिशेने रवाना झाले होते. हे जहाज अलिबाग परिसरात आले असता काहीतरी तांत्रिक कारणामुळे बंद पडले. यानंतर समुद्रात हेलकावे खात असल्याने समुद्रात जहाज नांगरून ठेवण्यात आले. मात्र गुरुवारी रात्री जहाजात अडकलेल्या 14 खलाशांच्या सुटकेसाठी शोधमोहीम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. समुद्रात उसळत असलेल्या लाटा व जोरदार पावसाच्या सरींमुळे रात्री शोधमोहीम राबविता आली नाही. शुक्रवारी सकाळी मुंबईहून तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर अलिबागमध्ये दाखल झाले. यानंतर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जहाजात अडकलेल्या खलाशांना जहाजातून समुद्रकिनारी आणण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;