ही कुठली लोकशाही? अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम का करताय? प्राध्यापिकेला छळणाऱ्या राज्य सरकारवर कोर्ट कडाडले

ही कुठली लोकशाही? अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम का करताय? प्राध्यापिकेला छळणाऱ्या राज्य सरकारवर कोर्ट कडाडले

प्राध्यापक महिलेला निष्कारण त्रास देणाऱ्या पोलिसांना शुक्रवारी उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत फटकारले. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम का करताय? ही कुठली लोकशाही? प्राध्यापिकेची विभागीय चौकशी करण्यासाठी कॉलेजला बेकायदा आदेश देणारे तुम्ही कोण? संबंधित पत्र मागे घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दम न्यायालयाने मिंधे सरकारला भरला. त्यानंतर सरकारी वकिलांनी बिनशर्त माफी मागितली आणि बेकायदा पत्र मागे घेतले.

कॉलेजमध्ये गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा संदर्भ दिला म्हणून महिला प्राध्यापिका डॉ. मृणालिनी आहेर यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पोलिसांनी कॉलेजला दिले. सातारा पोलिसांच्या त्या पत्राला डॉ. आहेर यांनी अॅड. युवराज नरवणकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

मराठी पुस्तक, मराठी संस्कृती विसरला का

प्राध्यापिकेवरील कारवाईचे समर्थन करण्यासाठी  हजर राहिलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे खंडपीठाने चांगलेच कान उपटले. ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक कधी वाचले आहे का? तुमचे शिक्षण किती? तुम्हाला नेमके ज्ञान किती आहे, इंग्रजीतून पदवी घेतली म्हणून तुम्ही मराठी पुस्तकांचे वाचन सोडून देणार का? मराठी संस्कृतीला तिलांजली देणार का? असा प्रश्नांचा भडिमार पोलीस अधिकाऱ्यावर केला.

कायदा कळतो का?

न्यायालयाने मिंधे सरकारचे वकील आणि पोलीस अधिकाऱ्यांना जवळपास 20 मिनिटे धारेवर धरले. तुम्हाला कायदा तरी कळतो का? कायद्याची पुस्तके नीट वाचा, कायद्याचा अभ्यास करा. राज्यघटना, विशेषतः नागरिकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य देणारी तरतूद नीट वाचा आणि मग प्राध्यापिकेने मांडलेले मत गुन्हा कसे ठरते याचे स्पष्टीकरण द्या, असे न्यायमूर्ती चव्हाण यांनी बजावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;