शिवसेनाप्रमुखांच्या तेजस्वी प्रतिमेला 27 हजार आकर्षक हिऱ्यांचा साज; उद्धव ठाकरे यांना पोर्टेट भेट

शिवसेनाप्रमुखांच्या तेजस्वी प्रतिमेला 27 हजार आकर्षक हिऱ्यांचा साज; उद्धव ठाकरे यांना पोर्टेट भेट

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी प्रतिमेला तब्बल 27 हजार हिऱ्यांचा साज मिळाला असून हे आकर्षक पोर्ट्रेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्ताने भेट मिळाले आहे. ख्यातनाम कलाकार शैलेश आचरेकर यांनी हे पोर्ट्रेट साकारले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून हे पोर्ट्रेट देण्यात आले. शिवसेनेचे जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि शैलेश आचरेकर यांच्या कलेतून हिऱ्यांनी नटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट आकर्षक झाले आहे. शैलेशने हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब खरोखर मनमोहक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल, अशी भावना हे पोर्ट्रेट स्नेहपूर्वक स्वीकारताना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

सहा महिने झाले बारकाईने काम

27 हजार हिऱ्यांनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईने यावर काम केले आहे. शिवसेनाप्रमुखांचे पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करताना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, स्वीय सहाय्यक रवी म्हात्रे, आर्टिस्ट शैलेश आचरेकर, अॅड. हर्षल प्रधान आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;