रतन टाटा यांची अनोखी प्रेम कहाणी; अभिनेत्रीच्या प्रेमात होते, आजही तिच्यासाठी…

रतन टाटा यांची अनोखी प्रेम कहाणी; अभिनेत्रीच्या प्रेमात होते, आजही तिच्यासाठी…

भारतीय उद्योजक आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. बुद्धिमान व्यावसायिक, मदतीसाठी कायम हात पुढे करणारी व्यक्ती म्हणून रतन टाटा यांची ओळख आहे. पण, रतन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही तितक्याच चर्चा झाल्या आहेत. रतन टाटा हे अविवाहित राहिले असले तरी तरुणपणात काही काळ ते रिलेशनशिपमध्ये होते. यात एका गाजलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत त्यांचे नाव जोडले गेले होते. आजही ती अभिनेत्री रतन टाटा यांची एक खूपच चांगली मैत्रिण आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

रतन टाटा हे तरुणाईच्या काळात एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. ही अभिनेत्री होती ‘कर्ज’ या गाजलेल्या चित्रपटामधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल. Rendezvous with Simi Garewal हा सिमी गरेवाल यांचा शो गाजला. त्यामध्ये खुद्द सिमी गरेवाल यांनी ही माहिती दिली. रतन टाटा यांच्यासोबतच्या रिलेशनशिपविषयी सांगताना त्या म्हणाल्या, ‘फार पूर्वी आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. ते खूप परफेक्ट आहेत. त्यांच्याकडे खूप उत्तम विनोदबुद्धी आहे. पैसा हा कधीच त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा नाही. परदेशात ते जितके आरामात असतात तितके ते भारतात नसतात.’

रतन टाटा यांच्यासोबत असलेले सिमी गरेवाल यांचे रिलेशन काही कारणामुळे तुटले. पण, त्यांची मैत्री कायम राहिली. सिमी यांनी त्यांच्या शोमध्ये सुद्धा रतन टाटा यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी रतन टाटा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप चर्चा केली होती. रतन टाटा हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात चार वेळा रिलेशनशिपमध्ये होते. पण, चारही वेळा त्यांचे लग्न ठरता ठरता मोडले. या अनुभवांमुळेच पुढे रतन टाटा यांनी कधीच लग्न केले नाही. हे रतन टाटा यांनीच सिमी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

कर्ज, मेरा नाम जोकर यासारख्या सिनेमांमुळे चर्चेत राहिलेल्या सिमी गरेवाल यांचे रिलेशनशिपसुद्धा खूप गाजले. मन्सूर अली खान पतौडी यांच्यासोबतही सिमी काही काळ रिलेशनशिपमध्ये होत्या. पण, नंतर त्यांचे नाते तुटले. मन्सूर यांनी पुढे अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केले. तर सिमी यांनी रवी मोहन यांच्याशी लग्न केले. पण, त्यांचेही लग्न फार काळ टिकू शकले नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;