Yavatmal News – त्रिकोणी प्रेम संबंधाचा भयानक अंत; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली निर्घृण हत्या

Yavatmal News – त्रिकोणी प्रेम संबंधाचा भयानक अंत; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली निर्घृण हत्या

>>प्रसाद नायगावकर

अनैतिक संबंधामुळे पतीने पत्नीचा खून केल्याच्या अनेक घटना तुम्ही वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील. मात्र यवतमाळ जिल्ह्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबल उडाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात राजुरावाडी या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाकर कवडुजी मारवाडे असे निर्घृण खून करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याचा काही वर्षांपूर्वी जयश्री नामक तरुणीशी विवाह झाला होता. तसेच त्यांना दोन मुले सुद्धा होती. सुखाचा संसार सुरू असतानाच जयश्रीचे सुरज सुनील रोहणकर या तरुणाशी प्रेम सबंध जमले. दोघांच्या गाठीभेटी वाढल्या आणि सुरज वारंवार घरी येऊ लागला. विशेष म्हणजे जयश्रीने त्याची ओळख मानलेला भाऊ अशी करून दिली होती. मात्र प्रभाकरला त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय येऊ लागला. त्यामुळे त्यांच्यात सारखे वाद व्हायला लागले. 25 जुलै रोजी आरोपी प्रभाकरच्या घरी आला आणि मध्यरात्री दोघांनी मिळून प्रभाकर झोपलेला असताता उशीने त्याचे तोंड दाबून त्याला ठार मारले. त्यानंतर दोघांनी मिळून प्रभाकरचा मृतदेह गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या राजुरवाडी फाटा परिसरात फेकून दिला. आज सकाळी (26 जुलै) सदर घटनेचा उलगडा झाला आणि स्थानिकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना व प्रभाकरच्या कुटुंबीयांना दिली.

घटनेची माहिती मिळताच घाटंजीचे ठाणेदार निलेश सुरडकर हे पथकासमवेत तेथे दाखल झाले़. त्यांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी करून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला़ आहे. अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी प्रभाकरची पत्नी जयश्री हिची कसून चौकशी केली़. त्यानंतर तिने खूनाची कबूली दिली, तसेच खूनात सामील प्रियकर रोहनचे नावही उघड केले़. त्यानंतर पोलिसांनी शिघ्रगतीने तपासचक्रे फिरवून आरोपी रोहन आणि जयश्रीला अटक केली़. तसेच मृत प्रभाकरचा भाऊ सुधाकर कवडुजी मारवाडे याची रितसर तक्रार घेत संबंधित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;