मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा, कोणताही ब्लॉक नाही

मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा, कोणताही ब्लॉक नाही

मध्य रेल्वे रविवारी (28-7-2024 रोजी) विविध अभियांत्रिकी आणि देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेणार आहे. मात्र, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे या मार्गावरली प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 यावेळेत माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 याकाळात सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यापुढे माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी 10.50 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यापुढे मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यावर थांबतील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि 15 मिनिटे उशीरा गंतव्यस्थानावर पोहोचतील.

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.20 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.03 वाजता सुटणार आहे. ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सकाळी 11.10 वाजता पोहोचेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कसारा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुपारी 3.59 वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 पर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि 10.50 वाजता पनवेल येथे पोहोचेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.16 वाजता सुटेल आणि पनवेल येथे सायंकाळी 4.36 वाजता पोहोचेल. ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.17 वाजता सुटेल आणि 11.36 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल पनवेल येथून 4.10 वाजता सुटेल आणि 5.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

ब्लॉकपूर्वी पनवेल येथे जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी 9.39 वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी 10.31 वाजता पोहोचेल. ब्लॉकनंतर पनवेल येथे जाणारी पहिली लोकल ठाणे येथून दुपारी 4.00 वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुपारी 4.52 वाजता पोहोचेल. ब्लॉकपूर्वी ठाणे येथे जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.41 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 11.33 वाजता पोहोचेल. ब्लॉकनंतर ठाणे येथे जाणारी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी 4.26 वाजता सुटेल आणि ठाणे येथे सायंकाळी 5.20 वाजता पोहोचेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशीसाठी विशेष लोकल चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नाही

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर शनिवार, रविवार 27/28 तारखेच्या मध्यरात्री 00:00 ते 04:35 वाजेपर्यंत जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत, सर्व अप आणि धीम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गांवरवळवण्यात येतील. त्यामुळे, रविवारी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी विभागात दिवसाच्या वेळेत कोणताही ब्लॉक असणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;