Solapur News – देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेला जोड्यांचा प्रसाद, पंढरपुरात शिवसेनेचे आंदोलन

Solapur News – देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेला जोड्यांचा प्रसाद, पंढरपुरात शिवसेनेचे आंदोलन

राजकीय षडयंत्र करुन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने जोडेमार आंदोलन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे व आ.अनिल परब यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न नुकताच उघडा पडला आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणून खोटी शपथपत्र तयार करण्याचा भाजपचा डाव देशमुख यांनी हाणून पडला. भाजपचे हे कुटील षडयंत्र या निमित्ताने उघडे पडले. विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय खालच्या पातळीचे राजकारण केले. त्यामुळे त्यांचा कटकारस्थाचा निषेध करण्यासाठी पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने जोडेमार आंदोलन करण्यात आले. यावेळी सुधीर अभंगराव, जयवंत माने, बंडू घोडके, रवी मुळे, संगीता पवार, पूर्वा पांढरे, विनय वनारे, लंकेश बुराडे, सचिन बंदपट्टे, प्रवीण शिंदे, इंद्रजित गोरे, श्रीनिवास उपळकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;