श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न; आता नित्य राजोपचार सुरू

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न; आता नित्य राजोपचार सुरू

पंढरपुरात आषाढी एकादशी सोहळा 17 जुलै रोजी संपन्न झाला. दरवर्षी यात्रेला भाविकांची गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार 7 जुलै रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता. श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आला होता. त्यामुळे श्रींची काकडा आरती, पोषाख, धुपारती, शेजारती इत्यादी नित्योपचार प्रक्षाळपुजेपर्यंत (दिनांक 26 जुलै) बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते.

26 जुलैच्या मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न झाली. या पुजेच्या सुरवातीला कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रींस पहिले स्नान घालण्यात आले. श्रींचा पलंग शेजघरामध्ये ठेवण्यात आला. तसेच श्रींचे सुरू असणारे 24 तास दर्शन बंद होऊन, सर्व नित्यराजोपचार सुरू होत आहेत.

श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरूजी व ह.भ.प.श्री.शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच देवाचा शिणवटा/थकवा घालविण्यासाठी आर्युवेदीक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारतीवेळी दाखविण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवारपासून श्री विठ्ठलास व श्री रूक्मिणीमातेस पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत. या पूजेच्या वेळी मंदिरात पौराहित्य करणारे कर्मचारी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व विभाग प्रमुख संजय कोकीळ व अतुल बक्षी उपस्थित असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;