आषाढी यात्रेत भाविकांचे भरभरुन दान; श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 8 कोटी 34 लाखाचे उत्पन्न

आषाढी यात्रेत भाविकांचे भरभरुन दान; श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 8 कोटी 34 लाखाचे उत्पन्न

आषाढी यात्रा सोहळा पंढरपुरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यासाठी 20 लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी आले होते. श्री विठ्ठलाकडे सुखसमृध्दीचे साकडे घालणार्‍या वारकर्‍यांनी विठुरायाच्या व रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले आहे. तसेच सोन्या चांदीचे कोट्यावधी रुपयांचे दागिने अर्पण केले आहेत. तर मंदिर समितीला लाडू प्रसाद, परिवार देवता, सोने भेट, ऑनलाईन देणगी, भक्तनिवास आदींच्या माध्यमातून 8 कोटी 34 लाख 84 हजार 174 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जे गतवर्षीच्या आषाढी यात्रेच्या 2 कोटी रुपयांनी जास्त आहे.

गेल्यावर्षी आषाढी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 6 कोटी 27 लाख 54 हजार 227 रुपये उत्पन्न मिळाले होते. मात्र यंदा उत्पन्नात 2 कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. या भाविकांनी श्रींच्या चरणी लाखो रुपयांचे दानही दिले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या परिवार देवतांकडून जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळालेले आहे. त्याचबरोबर श्रींना सोने, चांदीची देखील भाविकांनी भेट दिलेली आहे. 6 ते 21 जुलै या दरम्यान आषाढी यात्रेत भाविकांनी दान दिले आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व कर्मचारी यांनी चांगली सुविधा दिल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे पदस्पर्शदर्शन 483523 भाविकांनी तर मुखदर्शन 605004 भाविकांनी घेतले आहे. असे एकूण 10 लाख 88 हजार 527 भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले आहे. तर लाखो भाविकांनी नामदेव पायरी व कळस दर्शन घेतलेले आहे.
-बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, मंदिर समिती

असे मिळाले उत्पन्न
श्रींच्या चरणाजवळ रू.7706694
भक्तनिवास रू.5060437
देणगी रू.38226828
लाडूप्रसाद रू.9853000
पूजा रू.399209
सोने भेट रू.1788373
चांदी भेट रू.20365228
इतर रू.364000

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;