निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे फोटो व्हायरले केले; तरुणाला सरपंचाच्या ठेकेदार पतीकडून धमकी

निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे फोटो व्हायरले केले; तरुणाला सरपंचाच्या ठेकेदार पतीकडून धमकी

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील रस्त्यांवर केंद्र सरकारचा कोट्यवधींचा खर्च करुन रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने फक्त दोन ते तीन महिन्यातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचे फोटो गणेश दिलीप तोडमल या तरुणाने सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यामुळे टाकळीमियाचे सरपंचाचे पती तथा ठेकेदाराने तरुणाला मोबाईलवर संपर्क करत शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गणेश तोडमलने टाकळीमियाच्या सरपंच लिलाबाई चंद्रकांत गायकवाड, त्यांचे पती, ठेकेदार चंद्रकांत मोहन गायकवाड यांच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया व देवळाली प्रवरा ते मुसळवाडी या रस्त्यासाठी केंद्राच्या निधीतून हे रस्ते मंजुर केले आहेत. अवघ्या दोन तीन महिन्यापुर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सोसायटीजवळील अंगणवाडीतील चिमुरडे विद्यार्थी याच खड्ड्यातून पाण्यातून मार्ग काढत अंगणवाडीत जातात.

कोट्यवधी रुपये खर्च करुन हे रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते.अवघ्या तीन महिन्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने गावातील या समस्येचे फोटो गणेश तोडमल या तरुणाने सोशल मिडीयावर व्हायरल केले. सोशल मिडीयावरील फोटोवरुन टाकळीमियाचे सरपंच चंद्रकला गायकवाड आणि सरपंच पती तथा ठेकेदार चंद्रकांत मोहन गायकवाड यांना राग आला. त्यांनी गणेश तोडमल यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत गणेश तोडमल याने राहुरी पोलीस ठाण्यात टाकळीमियाचे सरपंच चंद्रकला गायकवाड आणि त्यांचे पती चंद्रकांत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

केंद्र सरकारचा निधी सर्वसामान्य जनतेच्या पैशांतून हा निधी उभारला गेल्याने या निधीतुन होणारी कामे चांगल्या दर्जाची होणे गरजेचे आहे. ठेकेदार व अधिकारी पैसे कमविण्यासाठी निकृष्ट दर्जाची कामे करतात. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या दोन महिन्यात रस्त्यावर खड्डे पडले आहे. या खड्ड्यांबाबत जाब विचारण्याचा ग्रामस्थ या नात्याने अधिकार आहे. ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामसभा बोलवावी ग्रामसभेमार्फत या रस्त्यांची क्वालिटी कंट्रोल मार्फत तपासणी करावी, अशी मागणी गणेश तोडमल यांनी केली. सरपंच व सरपंच पती यांनी तोडमल यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याने ग्रामस्थांनी निषेध केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;