अक्षय कुमारच्या मुलासोबत दिसणारी ‘ही’ मुलगी कोण? तिच्यापुढे बॉलिवूड अभिनेत्री फेल

अक्षय कुमारच्या मुलासोबत दिसणारी ‘ही’ मुलगी कोण? तिच्यापुढे बॉलिवूड अभिनेत्री फेल

अभिनेता अक्षय कुमार कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता सिनेमा किंवा इतर कोणत्या कारणामुळे नाही तर, मुलगा आरव याच्यामुळे चर्चेत आला आहे. खिलाडी कुमारचा मुलगा आरव याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आरव कधीच इतर सेलिब्रिटीकिड्सप्रमाणे लाईमलाईटमध्ये नसतो. आरव कायम स्वतःला झगमगत्या विश्वापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता सोशल मीडियावर अक्षय कुमारच्या मुलाचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये आरव याच्यासोबत एक मुलगी दिसत आहे.

आरव याच्यासोबत असलेली मुलगी कोण आहे असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असले. ज्या मुलीसोबत आरव याचा फोटो व्हायरल होत आहे, तो फोटो 2023 मधील आहे. फोटोत दिसणाऱ्या मुलीचं नाव नाओमिका सरन असं आहे. नाओमिका ही आरव याची मावशी रिंकी खन्ना हिची मुलगी आहे. नाओमिका आणि आरव मावस भावंडे आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Naomika Saran (@naomika14)

 

नाओमिका आणि आरव यांच्यामध्ये खास बॉन्डिंग आहे. नाओमिका कायम भाऊ आरव याच्यासोबत फोटो पोस्ट करत असते. नाओमिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर नाओमिका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. नाओमिका हिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचं सौंदर्य देखील फेल आहे. नाओमिका लंडन याठिकाणी राहते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Naomika Saran (@naomika14)

 

मुलगा आरव याच्याबद्दल काय म्हणाला होता अक्षय कुमार?

एका टॉक शोमध्ये अक्षय कुमार याने मुलगा आरव याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ‘आरव याने वयाच्या 14 व्या वर्षी घर सोडलं आहे. मला त्याला जाऊ द्यायचं नव्हतं, पण मी त्याला थांबवू देखील शकत नव्हतो कारण मी स्वतः वयाच्या 14 व्या वर्षी घर सोडलं आहे.’

‘आरव लंडन याठिकाणी एकटा राहातो. आरव स्वतःचे कपडे स्वतः धुवतो. त्याला स्वयंपाक देखील उत्तम बनवता येतो. माझा मुलगा कधीच नवीन कपडे घेत नाही. तो कायम स्वस्त आणि सेकेंड हँड कपडे खरेदी करतो. आम्ही त्याच्यावर कोणता दबाव टाकत नाही. आरव सध्या लंडन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे.’ असं मुलाबद्दल अक्षय कुमार म्हणाला होता.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;