“खिशात हात घालून सभागृहात येऊ नका”, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सत्ताधारी मंत्र्यांना दिला डोस

“खिशात हात घालून सभागृहात येऊ नका”, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सत्ताधारी मंत्र्यांना दिला डोस

सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षाचे खासदार अर्थसंकल्पावर प्रश्न उपस्थित करू सत्ताधारी पक्षाला भांबावून सोडत आहेत. अर्थसंकल्पावर संसदेत चर्चेची गुऱ्हाळे सुरू असताना काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव नोटीस दिली आणि सीमेवरील परिस्थिती तसेच चीनसोबतच्या व्यापारातील मोठ्या घाट्या संदर्भात चर्चेची मागणी केली. यावेळी एक आश्चर्याची गोष्ट घडली. नेहमी विरोधी पक्षावर ताव खावून असणारे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सत्ताधारी मंत्र्यांनाच डोस पाजला.

संसदेतील प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना भाजपचे बंगळुरू ग्रामीण मतदारसंघाचे खासदार डॉ. सी.एन. मंजुनाथ एक प्रश्न उपस्थित करत होते. याच दरम्यान एका मंत्र्यांनी संसदेमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा हावभाव पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा पार चढला. भर लोकसभेत बिर्ला यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मंत्रीजी हात खिशातून बाहेर काढा, असा आदेशच ओम बिर्ला यांनी दिला. यावेळी त्यांनी इतर सदस्यांनाही आवाहन केले की, कृपया हात खिशामध्ये घालून सभागृहात येऊ नका. यावेळी मंत्री महोदयांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांना रोखत ओम बिर्ला म्हणाले की, मंत्री महोदय आपण मध्येच का बोलत आहात? काय विचारायचे आहे जरा सांगा. हात खिशात घालण्यासंदर्भात आपण परवानगी द्याल का? आणि दुसरी विनंती अशी आहे की, जेव्हा एखादा माननीय सदस्य बोलत असेल तेव्हा कुणीही त्यांना क्रॉस करून पुढे येऊन बसू नये. त्यांच्या मागे जाऊन बसा, असे ओम बिर्ला म्हणाले. दरम्यान, ओम बिर्ला नक्की कोणत्या मंत्र्यावर भडकले हे कळालेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;