पॅरिसमध्ये ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीआधी मोठी घटना; ट्रेनवर हल्ला, 8 लाख रेल्वे प्रवाशांना फटका

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीआधी मोठी घटना; ट्रेनवर हल्ला, 8 लाख रेल्वे प्रवाशांना फटका

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीच्या काही तास आधीच फ्रान्समध्ये ट्रेनवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे फ्रान्समधील हाय-स्पीड रेल्वेसेवा शुक्रवारी विस्कळीत झाली आहे. फ्रान्सच्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कवर जाळपोळ करण्यात आल्याचे फ्रेंच ट्रेन ऑपरेटर कंपनी एसएनसीएफने सांगितले. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

हल्ल्यानंतर रेल्वे ऑपरेटर कंपनी एसएनसीएफने एक निवेदन जारी केले आहे. ‘अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत’, असे एसएनसीएफ या निवेदनात म्हटले आहे. तसेच नागरिकांना रेल्वे प्रवास टाळण्याचा आणि रेल्वे स्थानकांपासून दूर राहण्याचा सल्ला एसएनसीएफने दिला आहे.

रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने सुमारे 8 लाख प्रवाशांवर त्याचा फटका बसला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक मनुष्यबळाचा वापर करून रेल्वे नेटवर्क पूर्ववत करण्याचा विचार सुरू आहे, असेही एसएनसीएफने स्पष्ट केले.

पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेत 7500 खेळाडू सहभागी होणार आहेत. तर 300000 प्रेक्षक आणि VIP ची उपस्थित राहणार आहे.

“फ्रान्समधील या घटनेमुळे पॅरिस आणि लिले दरम्यानच्या हायस्पीड लाइनवर परिणाम झाला आहे. पॅरिसला जाणाऱ्या आणि तेथून जाणाऱ्या सर्व हायस्पीड गाड्या शुक्रवारी क्लासिक लाईनने वळवल्या जात आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे दीड तासाने वाढला आहे”, फ्रान्समधील रेल्वे कंपनी युरोस्टारने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;