Janhvi Kapoor: सोशल मीडियावर प्रशंसा मिळवण्यासाठी जान्हवी देते पैसे? मोठं सत्य समोर
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर हिने ‘धडक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जान्हवीचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला, पण अभिनेत्रीने मागे वळून पाहिलं नाही. पहिल्या सिनेमानंतर अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. नुकताच अभिनेत्री ‘मिस्टर ऍन्स मिसेज माही’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमातील जान्हवीच्या अभिनयाला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. दरम्यान, नुकताच झालेल्या एक मुलाखतीत जान्हवी हिने सोशल मीडियावर मिळत असलेल्या प्रशंसेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सोशल मीडियावर जान्हावीची प्रशंसा करावी यासाठी अभिनेत्रीची पीआट टीम काम करते? अशी चर्चा आहे. यावर बोलताना जान्हवी हिने रंगणाऱ्या सर्व चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे. मुलाखतीत जान्हवीला विचारलं, सोशल मीडियावर प्रत्येक जण तुझं कैतुक करत असतं… यावर अभिनेत्री विनोदी अंदाजात म्हणाली, ‘हे… कौतुक करण्यासाठी पैसे देत आहे…’
एक अभिनेत्री म्हणून स्वतःला कसं पाहाते असा प्रश्न देखील जान्हवीला विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी माझ्या अभिनयावर काहीही बोलू शकत नाही. समोरच्यावर निर्भर करतं त्याला माझा अभिनय आवडत आहे की नाही… मला माझ्यावर आत्मविश्वास आहे… मी चांगल्या भूमिका साकारत आहे ना?’ असा प्रश्न देखील अभिनेत्रीने उपस्थित केला.
पीआर आणि जान्हवी कपूर
पीआरबद्दल सोशल मीडियावर रंगत असलेल्या चर्चांबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘सोशल मीडियावर कोणीही चुकून कौतुक करतं, पण लोकं म्हणतात मी पैसे देते. असं काहीही नाही, माझा इतका बजेट नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र जान्हवी कपूर हिची चर्चा रंगली आहे.
जान्हवी कपूर हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच दिग्दर्शक सुधांशु सरिया द्वारे दिग्दर्शित ‘उलझ’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात जान्हवी हिच्यासोबत गुलशन देवैया, रोशन मैथ्यू, आदिल हुसैन, राजेंद्र गुप्ता, राजेश तैलंग, मेयांग चांग आणि जितेंद्र जोशी हे सेलिब्रिटी देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सिनेमा 2 ऑगस्ट 2024 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List