मलायका अरोराच्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री? पोस्ट शेअर करत म्हणाली…

मलायका अरोराच्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री? पोस्ट शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका हिने लग्नाच्या 19 वर्षांनंतर अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट दिला. त्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. पण अर्जुन याच्यासोबत देखील मलायकाचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. ब्रेकअपच्या चर्चा तुफान रंगल्यानंतर मलायका हिने मिस्ट्री मॅनसोबत फोटो पोस्ट केला होता. ज्यामुळे अभिनेत्रीच्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री झाली अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगली. दरम्यान, मलायकाने पुन्हा एक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे.

मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केली आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘प्रत्येक आनंद… प्रेमळ शब्द… प्रत्येक प्रकारचं कार्य आपल्या आत्म्याच्या सौंदर्याचं प्रतिबिंब आहे.’ सध्या मलायका हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. पोस्टच्या माध्यमातून मलायका काय सांगू इच्छिचे हे फक्त तिलाच माहिती…

सांगायचं झालं तर, अभिनेता अर्जुन कपूर देखील गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर करत आहे. त्यामुळे मलायका – अर्जुन यांचं नातं कोणत्या वळणावर आहे. याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही. नुकताच अर्जुन कपूर याचा वाढदिवस झाला. वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्याच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

पार्टीत अनेक सेलिब्रिटी दिसले पण मलायका अरोरा दिसली नाही. शिवाय मलायका हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्जुन याला शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून मलायका – अर्जुन यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन – मलायका यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;